लोहा तालुक्यामध्ये आनंदाचा शिधा वितरणास प्रारंभ: मा.श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 19, 2022

लोहा तालुक्यामध्ये आनंदाचा शिधा वितरणास प्रारंभ: मा.श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ

लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जनतेला दिपावलीच्या सणासाठी आनंदाचा शिधा उपलब्ध करुन  देण्याच्या कार्यक्रमास लोहा तालुक्यामध्ये आमदार माननीय श्यामसुंदरजी साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी लोह्याचे नायब तहसीलदार राम बोरगावकर साहेब,गोदामपाल सतिष धोंडगे यांच्यासह लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, सचिन पा.क्षीरसागर, सिद्धु पा.वडजे,शेकाप ता.अध्यक्ष नागेश पा.खांबेगावकर, राहुल पा.बोरगावकर, सुधाकर पा.सातपुते,सचिन कल्याणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.लोहा तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व (A.P.L.) योजनेअंतर्गत एकुण 50182 कार्ड धारकांना प्रतिशिधापत्रिका 1 K.G. ,1Kg.साखर,1Kg.चनाडाळ,व 1लिटर पामतेल असा शिधाजजिन्नसंच केवळ 100रुपयामध्ये स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध केला जात आहे. यासाठी पुढील तीन-चार दिवसात तालुक्यातील एकुण 166 स्वस्त धान्य दुकानामधुन पात्र प्रत्येक लाभार्थ्याला *आनंदाचा शिधा जिन्नस* संच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ना.तहसीलदार बोरगावकर साहेब यांनी सांगितले🙏