सहसंपादक
अजय चोथमल
वाशीम जिल्ह्यात समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक गावा गावात स्थापनेसाठी पुढाकार
भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर, संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा आद. महाउपाशीका मीराबाई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब वाशीम जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष वाशिम सिद्धार्थ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर आश्विन खिल्लारे मागील काही वर्षा पासून समता सैनिक दला साठी मोठ्या जोमाने काम करत आहे. याचीच पावती म्हणून आता वाशीम जिल्ह्यातील तालुक्यातील गावा मध्ये समता सैनिक तयार होत आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, माणोरा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव समता सैनिक दलाची शाखा तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या साठी दिवस रात्र मेजर आश्विन खिल्लारे वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्यातील प्रत्येक गावा गावात समता सैनिक दलाची शाखा तयार करण्याचे काम करत आहेत. या साठी. भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष अनिल तायडे
(मालेगाव), शालिकराम पठाडे ( रिसोड ), हर्षल इंगोले ( कारंजा ), प्रमोद बेलखेडे ( मंगरुळपीर ), सतिष भगत ( माणोरा ) सहकार्य करत असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात समता सैनिक दलाची शाखा तयार होत आहे. तर या मध्ये मोठ्या प्रमाणात महिला सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अशी माहिती मेजर आश्विन खिल्लारे समता सैनिक दल प्रमुख वाशीम यांनी दिली आहे.