कौठळ भाविकांचे श्रद्धास्थान- बिजासन देवीची उत्पत्ती कशी झाली ? - JDM

JDM


Breaking

Monday, October 3, 2022

कौठळ भाविकांचे श्रद्धास्थान- बिजासन देवीची उत्पत्ती कशी झाली ?

प्रतिनिधी/संजय महाजन
कौठळ ता.जि. धुळे येथील बिजासन देवीचे मंदिर धुळे/ नंदुरबार/जळगाव वाशीयांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. आई बिजासन देवीची उत्पत्ती कशी झाली? 
याची माहिती भागवत पुरानात दिली गेली आहे.
रक्तबीज नावाच्या राक्षस होता. 
त्याच्या अत्याचाराला लोक कंटाळले होते. त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर दुसरा राक्षस तयार होत होता. 
तेव्हा लोक आई दुर्गा जवळ पोहोचले. आई दुर्गाने त्याचा अंत करण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले. 
रक्तबीज व महाकाली यांच्यात प्रचंड युद्ध झाले. रक्ताचे थेंब जमिनीवर पडू नये म्हणून जिभेचा वापर केला. शेवटी राक्षसाचे शिर आणि धड वेगळे केले. शिर मधून रक्त पडू नये म्हणून एका भांड्यात रक्त जमा करून पिऊन घेतले. रक्त पिल्यामुळे पिजासन/ बिजासन असे नामकरण झाले.
कौठळ येथील बिजासन देवीच्या दर्शनासाठी धुळे/ नंदुरबार/जळगाव जिल्ह्यातील लोक येत असतात. बिजासन माता महाराष्ट्राची कुलदैवत आहे. या देवीचे रूप अलौकिक व अद्भुत आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने त्यावेळी नवस, शेंडी, मान, मानता, लग्न असे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. नवसाला पावणारी व सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी देवता असल्यामुळे या परिसरातील भाविकांची श्रद्धास्थान झाली आहे. या मंदिराचे बांधकाम प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी केले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी केले आहे.