नुकताच सोशल मिडियावर एक हजार चर्मकार बांधव १४ ऑक्टोबरला औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात धम्मदिक्षा घेणार ही पोस्ट व्हायरल झालेली आपण वाचलेली असेलच.
याबाबत आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील चर्मकार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यां सोबत चर्चा केली तेंव्हा असे समजले आहे की, चर्मकार बांधवांमधून कोणीही धम्मदिक्षा घेण्यासाठी इच्छुक नाही. कारण जिल्ह्यातील चर्मकार बांधवांना सद्या तरी हिंदु धर्म सोडण्यासाठी त्यांच्यावर कोणीही अन्याय, अत्याचार, छळ करीत असल्याचे वातावरण नाही. जर असा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या, खंबीरपणे काम करणाऱ्या चर्मकार समाजातील सामाजिक संघटना जिल्ह्यात व राज्यात बऱ्याच आहेत. त्यामुळे चर्मकार समाज बांधव भगिनींना आपला धर्म बदलविण्याचे काहीच कारण नाही.
ही पोस्ट टाकणाऱ्या महोदयांना विनंती करण्यात येते की, औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या एक हजार चर्मकार बांधवांना ते धम्मदिक्षा देणार आहेत त्यांनी त्या एक हजार चर्मकार बांधवांची नावे त्यांच्या जातीच्या दाखल्यांसह यादी जाहीर करावी लागेल. जर त्यांनी ती यादी जाहीर केली नाही तर चर्मकार समाजाची दिशाभूल करणाऱ्या व चर्मकार समाजाला कमकुवत समजणाऱ्या या व्यक्तीं वर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विविध चर्मकार संघटना आणि हिंदु बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आपल्या संबंधित जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळांव्दारे निवेदने देवून जाहीर निषेध करणार आहेत
अशी माहिती हिंदु बहुजन महासंघाचे प्रवक्ता योगेशजी भागवतकर यांच्या कडून देण्यात आलेली आहे*
जर शासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर हिंदु बहुजन महासंघाच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.