शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
भारतीय जनता पार्टी, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र गोंदकर यांनी तसेच राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्णजीं विखे पाटील साहेब यांनी "नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक" नाव नोंदणी समितीच्या "राहाता मंडल संयोजक" (तालुका प्रमुख) म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुकाध्यक्ष स्वानंद (भैय्या) रासने यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच याच बरोबर राहाता संस्था संपर्क प्रमुख म्हणून श्री अशोक पवार व विचार, परिवार संपर्क प्रमुख म्हणून श्री किरण बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या नियुक्ती फार महत्वाच्या ठरणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ हा नेहमीच भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु मागील काही निवडणुकीं पासून या मतदार संघांमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय होत आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराजित करत नाशिक पदवीधर मतदार संघ हा पुन्हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला व्हावा यासाठी योग्य सूक्ष्म नियोजन व सचोटीने काम केल्यास यश नक्कीच मिळेल. सदरच्या संघटनात्मक नियुक्त्या ह्या येणाऱ्या निवडणुकीत मैलाचा दगड ठरणार आहे. अशी अपेक्षा भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुका अध्यक्ष श्री स्वानंद रासने यांनी व्यक्त केली.
सदर नियुक्ती बाबत विविध स्थरातून पदाधिकाऱ्यांना अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहे.