घाटनांद्रा प्रतिनिधी
गणेश शिंदे
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे जंगी कुस्ती स्पर्धा राम रहीम कुस्ती आखाडा मंडळ यांच्या वतीने भव्य असे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे कुस्त्यांचा आखाडा बंद होता त्यामुळे पहिलवान यास कुस्तीशोधनांचा हिरमोड झाला होता.
मात्र यावर्षी पुन्हा कुस्त्यांचे आखाडे सुरू झाले सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे ग्रामस्थ मंडळी व राम रहीम आखाडा मंडळाचे पंच कमिटीच्या वतीने आयोजित जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक दिग्गज पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता दहा रुपयापासून ती शेवटची आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी पाच हजार शंभर रुपयांची कुस्ती सर्वांसाठी आकर्षक ठरली सिल्लोड तालुक्यातील दिग्गज पैलवाना सह औरंगाबाद जालना बीड बुलढाणा जळगाव आधी ठिकाणाच्या पैलवानी या स्पर्धेत सहभाग घेतला कुस्त्यांचे दंगल सुरळीत व्हावी यासाठी ग्रामस्थांनी विशेष नियोजन केले होते.
यावेळी या कार्यक्रमासाठी सिल्लोड माझी नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार सिल्लोड माजी सभापती अशोक गरुड जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडेकर माजी सभापती डॉक्टर संजय जामकर माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र मोरे यांनी यावेळी कार्यक्रमाला भेट दिली कार्यक्रमासाठी सरपंच यासीन तडवी मंडळाचे अध्यक्ष युवराज मोरे उपाध्यक्ष शेख मोशीन कोषाध्यक्ष सुखदेव केवट सल्लागार शिवाप्पा कोठाळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम सुरळीत पार पाडा म्हणून आमठाणा बीड जमादार अनंत जोशी हेड कॉन्स्टेबल बावस्कर, पोलीस पाटील नाशिर तडवी कोतवाल पीरखा तडवी यांनी चोक बंदोबस्त ठेवला.