मालेगाव प्रतिनिधी
संतोष लोंढे
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाशिम दौरा असताना मालेगाव येथे भाजपाच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष सुरेश राव मुंडे यांनी निवेदन दिले.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये किन्हीजा आणि जऊळका मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती.
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तरी अद्याप पर्यंत शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळालेली नाही, सदरील नुकसान भरपाई त्वरित मिळावी असे निवेदनात नमूद केले आहे.