श्रीरामपूर स्मशानभूमी भागात आझादनगर नाम फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम थाटात संपन्न - JDM

JDM


Breaking

Monday, September 19, 2022

श्रीरामपूर स्मशानभूमी भागात आझादनगर नाम फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम थाटात संपन्न

शौकतभाई शेख 
श्रीरामपूर प्रतिनिधी
येथील वार्ड क्रमांक ६ स्मशान भूमी परिसरातील भागास आझादनगर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली असून या नावाच्या फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक १९/ ०९/२०२२ रोजी हॉटेल निलायम जवळील चौकात मोठ्या थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे, युवा नेते सिद्धार्थ फंड, नगरसेवक मुख्तार शाह ,महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, समाजसेवक साजिदभाई मिर्झा, एआयएमआयएमचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदिलभाई मखदूमी युवक काँग्रेस शहर सचिव रफिक शेख, समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार ,अलनूर यंग सर्कलचे अध्यक्ष जावेदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते शाहिद कुरेशी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार एजाज सय्यद, पत्रकार मोहम्मदअली सय्यद, पत्रकार मुबारक शेख, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी या भागातील कार्यकर्त्यांनी फलकाच्या अनावरण प्रसंगी फटाक्याच्या गजरात आपला उत्साह दाखविला या वेळी कार्यक्रम नियोजन समितीचे युवा नेते अमजद शेख व इतरांच्या सहभागातून सस्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमजद शेख व त्यांचे सहकारी मित्र हनीफ फिरोज शेख, इरफान अफसर शेख, जमीर अन्वर शेख, रफिक सलीम शेख, अजमुद्दिन जैनुद्दीन सय्यद ,निसार मुबारक शेख, समीर अफजल शेख, फिरोज दगडू तांबोळी, जफर अफजल शेख, उस्मान दगडू तांबोळी, अजिज उस्मान शेख, चांद मोहम्मद, इरफान शफिक शेख, अर्जुन मधुकर अहिरे, सलीम खलील शेख, तय्यब हसन पठाण, रवी मधुकर अहिरे, नजीर मंजूर पठाण, सुमित राजू पवार, अमोल राजू पवार, प्रमोद भुजंग विकळीकर, रवी दिलीप चौधरी, अजिज मेहबूब पठाण, शकील जान मोहम्मद शेख, समीर मोहम्मद शेख, बाबर जान मोहम्मद शेख, मोहम्मद नूरा शेख, दीपक भीमराव सोनसळे, आमजद मेहबूब तांबोळी, शब्बीर मस्तान शेख, समीर आयाज पटेल, रियाज शफी शेख, आसिफ मोहम्मद, हनीफ शेख, नदीम शफी शेख, आदींनी विशेष परिश्रम घेतले.