मुक्ताईनगर तालुक्यातील को-हाळा गावात पुन्हा धावणार लालपरी - JDM

JDM


Breaking

Monday, September 19, 2022

मुक्ताईनगर तालुक्यातील को-हाळा गावात पुन्हा धावणार लालपरी

मुक्ताईनगर तालुका प्रतीनीधी 
नागेश महाजन
तब्बल एक नाही दोन नाही दहा वर्षांनी कोऱ्हाळा गावांमध्ये बस सेवा सुरु जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या कोऱ्हाळा गावातील विद्यार्थ्यांच्या होत असलेली गैरसोय, शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना कित्येक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत होते  विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी बसच्या बाबत समस्या अडिअडचणी जनसंवाद यात्रेत विद्यार्थ्यांनी मांडल्या. 
त्या अनुषंगाने आ.रोहिणीताई खडसे खेवलकर* यांनी मुक्ताईनगर बस आगाराचे व्यवस्थापक यांच्या सोबत चर्चा करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवील्या
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी विद्यार्थ्यांची समस्या सोडवत बस सेवा सुरु करुन हा प्रश्न मार्गी लावला.
हा तिढा कायम चा सुटला असुन विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.
तरी शाळेतील विद्यार्थी आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने आ.रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा  यासाठी, कोऱ्हाळा गावातील उपसरपंच प्रविण प्रल्हाद कांडेलकर संतोष शामराव कांडेलकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.