संजय महाजन
सियाचीन येथे शहीद झालेले वीर जवान मनोहर पाटील यांच्या अंत्यविधी दिवशीदिनांक ७ रोजी अपरिहार्य कार्यामुळे येऊ न शकल्यामुळे धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, धुळे शहराचे माजी आमदार राजूबाबा कदमबांडे यांनी आज मनोहर पाटील कुटुंबाला सांत्वना देण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेतली व आपला मुलगा देशाच्या कामी आला.
ही अभिमानास्पद बाब आहे त्याच्यामुळे दुःख बाळगू नये असे नातेवाईकांना समजावून वडील रामचंद्र पाटील व नातेवाईकांना सांत्वना दिली. यावेळी नूतन विद्यालयाचे अध्यक्ष दिलीपभाऊ उपाध्ये, माजी सरपंच देविदास जिरे, विजूआप्पा पवार , राजाराम बापू सैंदाणे, रमेश दादा जैन, भास्कर माळी, जेष्ठ नेते अमृतराव पवार, पुंडलिक कोळी, राजूबापू भावसार, भाऊसाहेब माळी, राजूभाऊ काकूळदे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.