माऊली वृद्धाश्रमातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे सेवेला भक्तीचे पावित्र्य लाभले : प्राचार्य शेळके - JDM

JDM


Breaking

Thursday, September 8, 2022

माऊली वृद्धाश्रमातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे सेवेला भक्तीचे पावित्र्य लाभले : प्राचार्य शेळके

शौकतभाई शेख 
श्रीरामपूर प्रतिनिधी
येथील शिरसगांव परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माऊली वृद्धाश्रमात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, हे पवित्र कार्य आहे.या मंदिरामुळे वृद्धाश्रमाला सेवारूपी भक्तीचे पावित्र्य लाभले आहे असे मत माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले. 
  येथील माऊली वृद्धाश्रमात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते. मंदिरात विधिवत पूजा, प्रार्थना, भजने आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.तसेच श्रीशंकर पिंड,श्रीनंदीमूर्तीचे पूजन करण्यात आले.वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे, सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. व नियोजन केली. 
यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माऊली वृद्धाश्रमात आता भक्ती आणि समाजशक्तीचे वातावरण निर्माण होईल, सुभाष वाघुंडे आणि सौ.कल्पनाताई वाघुंडे यांना भक्तीचे आणि समाजाचे वैभव प्राप्त होईल, वारकरी संप्रदायास एक समर्थ स्थान झाल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, सुखदेव सुकळे,सौ.उज्वला बुरकुले, सौ. सुरेख बुरकुले,शुभम नामेकर आदीसह शेकडो भक्तगण, समाजसेवक यावेळी उपस्थित होते. 
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारणीसाठी शिरसगांव ग्राम पंचायत चे सर्व सदस्य,कर्मचारी तसेच प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.आबासाहेब गवारे व अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सदस्या सौ.शीतलताई गवारे यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे. कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र रासने, राजेंद्र देशपांडे,गवळी आप्पा, गौरव रासने, व श्री गंगागिरी महाराज भक्त मंडळाचे सदस्यांची मदत झाली. शेवटी सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.