संजय महाजन
जगातील सर्वात उंच युध्द क्षेत्र असलेल्या अतिबर्फाळ प्रदेश सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी कर्तव्य बजावतांना प्रकृती बिघडून वीर मरण आलेल्या शहीद जवान मनोहर पाटील यांना आज न्याहळोद येथे हजारोंच्या जनसमुदायाने सअश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद जवान मनोहर पाटील अमर रहे.. घोषणांनी न्याहळोद गाव दुमदुमले. राष्ट्रभक्तीच्या भारावलेल्या वातावरणात मनोहर पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, प्रातांधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.सदस्य किरण पाटील, प. स.सदस्य योगराज पवार गट प्रमुख दिलिप उपाध्ये, माजी उपसरपंच देविदास जिरे, सरपंच ज्योती भील यांच्यावर उपस्थित मान्यवरांनी शहीद जवान मनोहर पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजली वाहिली. पोलिस दलातर्फे २४ तर भारतीय सैन्य दलातर्फे २४ अशा बंदूकीच्या ४८ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
जगातील सर्वात उंच युध्द क्षेत्र असलेल्या अतिबर्फाळ प्रदेश झाल्याने व सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत रुग्णालयात असतांना प्रकृती बिघडल्याने उपचार सुरु असतांना हवालदार मनोहर प्राणज्योत म रामचंद्र पाटील (४२) रा. न्याहळोद (ता. धुळे) हे भारतीय सैन्य दलात 2001 ला भरती झाला होता त्याच्यानंतर त्याने विविध ठिकाणी सेवा बजावत शेवटी ग्वालियर येथे सेवा बजावत असताना शून्य डिग्री अंश सेल्सिअस तापमान मध्ये सेवा बजावत असताना डोक्याच्या मागच्या मेंदूला रक्त गोठून गेल्यामुळे दोन महिने आर्मी कॅम्प येथील दवाखान्यात कोमा मध्ये गेल्यामुळे दिनांक पाच रोजी त्याची प्राणज्योत मालवली ग्वालियर ते दिल्ली व दिल्ली ते पुणे व पुणे ते प्रवास करीत दिनांक आठ रोजी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना शासकीय इत्तमात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढून नूतन विद्यालय व साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी ग्रामस्थ महिला सगळे हिरीहिरीने गावात भारत माता की जय वीर जवान अमर रहे घोषणांनी न्याहळोद दुमदुमून गेले होते, अंतिम संस्कार कार्यक्रमाचे आयोजन सर्व माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.