ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न - JDM

JDM


Breaking

Monday, September 19, 2022

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न

अंदरसुल प्रतिनिधी
अंदरसुल ता येवला येथील वै.ह.भ.प.सुभाष गुरू महाराज पाठक अंदरसुलकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त व श्री ज्ञानेश्वरी प्रत शुद्धी दिन निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न झाला.
यावेळी पहाटे काकडा आरती , सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचने , हरिपाठ रात्री हरिकीर्तन आदी कार्यक्रम पार पडले.
दरम्यान महाराष्ट्राती नामवंत कीर्तनाचार्यांनी या ठिकाणी येऊन सुश्राव्य असे ज्ञानदान केले.प्रसंगी ह.भ.प.संजय महाराज जगताप , ह.भ.प. अनिल महाराज दातार , ह.भ.प.मधुसूदन महाराज मोगल , ह.भ.प.कैलासगिरी महाराज ,ह.भ.प.जगदीश महाराज जोशी , ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) , ह.भ.प.संदिपान महाराज शिंदे हसेगावकर ,तसेच महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली.
दरम्यान परिसरातील येवला , वैजापूर ,कोपरंगाव तालुक्यातील भाविकांनी या कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.