लांडगेवाडीचा आदर्श जिल्ह्यांनी घ्यावा :भीमाशंकर मामा कापसे - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 21, 2022

लांडगेवाडीचा आदर्श जिल्ह्यांनी घ्यावा :भीमाशंकर मामा कापसे

आझाद  ग्रुप च्या वतीने लांडगेवाडीचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब टोपारे व सर्व ग्राम पंचायत सदस्याचा भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते सत्कार 
--------------------------------------
लोहा /प्रतिनिधी किरण दाढेल
लांडगेवाडीचा आदर्श जिल्ह्यांनी घ्यावा असे प्रतिपादन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी लांडगेवाडी येथे आझाद ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच  बाळासाहेब टोपारे व सर्व नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्याच्या  सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
यावेळी लांडगेवाडीचे  नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब टोपारे, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मीबाई नेळगे, रूपाली लांडगे, रुक्मिणीबाई मुलगे, ज्योती  बल्लोरे , ग्राम पंचायत सदस्य विश्वनाथ पाटील लांडगे यांचा आझाद ग्रुपच्या वतीने  आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते   भव्य सत्कार करण्यात आला. तसेच विरोधी पक्षांचे दोन ग्राम पंचायत सदस्य निवडून आले असून  ग्राम पंचायत सदस्या मंगला वारकड व मारोती लांडगे   यांचा ही आझाद ग्रुपच्या वतीने भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व एक आदर्श निर्माण केला. 
 लोहा तालुक्यातील मौजे लांडगेवाडी ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली व ग्राम पंचायतीवर आझाद ग्रुपचा झेंडा फडकला असुन आझाद ग्रुपचे मराठवाडा संघटक बाळासाहेब टोपारे हे थेट जनतेमधून निवडून येऊन लोकनियुक्त सरपंच झाले तर त्यांच्या सोबत आझाद ग्रुपचे ७ पैकी ५ ग्राम पंचायत सदस्य ही निवडून आले असून लांडगेवाडी ग्राम पंचायतीवर आझाद ग्रुपची सता स्थापन झाली आहे.
 या नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्याचा आझाद ग्रुपच्या वतीने शाल, श्रीफळ , खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते करण्यात आला.
 यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा  हक्क दिला आहे . मतदान हे भ्रष्टाचार मुक्त झाले पाहिजे  निवडणूक ही ग्राम पंचायती असो की, आमदार, खासदारकीची असो की कोणतीही असो पैसे घेऊन मतदान करु नये . लांडगेवाडी येथील ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत  मतदारांनी लोकशाही मजबूत करत एक पैसा ही न घेता मतदान करुन ग्राम पंचायत निवडून दिली. मताला पैसे देणे हे मला मान्य नाही. लांडगेवाडी येथील नागरिकांनी एक पैसा ही न घेता मतदान केले
 हा एक जिल्ह्यासमोर आदर्श झाला आहे खरी लोकशाही यालाच म्हणतात .आझाद ग्रुपचे मराठवाडा संघटक बाळासाहेब टोपारे हे लांडगेवाडीच्या सरपंच पदी निवडून आले आहेत जनतेनी त्यांना निवडून दिले आहे . आता त्यांनी गावाचा विकास करावा गावाच्या विकासासाठी त्यांनी आमदार, खासदारांकडे गेले पाहिजे पण कुणाचे गुलाम होऊ नये.
" लोकहित सर्वपरी" हे आझाद ग्रुपचे ब्रिद वाक्य आहे त्याप्रमाणे लोकहित जपावे  तसेच नवपिढीला एक आवाहन करतो भविष्यात आमदरकी, खासदारकी कोणतीही निवडणूक असो मताला एक पैसा ही घेऊ नका.मी गावकऱ्यांचे अभिनंदन करतो. लांगडेवाडीचा आदर्श जिल्ह्यांनी घ्यावा मी नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब टोपारे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांना शुभेच्छा देतो . गावात रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्याव्यात असे भीमाशंकर मामा कापसे म्हणाले.
 यावेळी आझाद ग्रुपचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे ,लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर,   प्रसाद पोले, उद्योजक बंटीभाऊ नरबळे ,विजय केंद्रे, तातेराव पाटील , बाबुराव बल्लोरे, गजानन जाधव, संतोष सोलापुरे, सचिन लांडगे, माणिक पवार, लक्ष्मण करडे, राधेश्याम मुलगे, बालाजी मुलगे, यांच्या सहित गावकरी मंडळी उपस्थित होती.