लोहा तालुका प्रतिनिधी
किरण दाढेल
लोहा शहरासह परिसरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असुन,यात तरुनाई व्यसनाच्या आहारी जात असुन, गांजा हा अंमली पदार्थ शहरात सहज रित्या मिळत असल्याने व्यसनाधीन युवकांचे प्रमाण वाढत आहे.
गांजा,व्हाईटनर सारख्या अंंमली पदार्थांचे सेवन (नशा)करण्यासाठी शहरातील ठराविक ठिकाणी प्रसिध्द असुुुन,या प्रकरणी पोलिसानी शहरात गांजा विक्रीकरणाऱ्याावर कडक कारवाई करावी अशी मागणी शहरातील युवकांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
मागिल काळात गांजा ही अटल व्यसनी किंवा गुन्हेगारी यांच्या पुर्ता मर्यादीत होता परंतु लोहा शहरात गांजाची नशा लहान मुलासह सर्व सामान्य झाला असुन, गांजा या नशेसह व्हाईटनर,स्टीकफाँस्टच्या ही नशेत भर पडत असुन, निवेदनात नमुद केलेल्या ठराविक ठिकाणा पैकी शहरातील श्री. संत. गाडगे महाराज हायस्कुल मैदान, वखार महामंडळ मैदान व व्यकंटेश गार्डन परिसर अशा कांही ठराविक ठिकानी अंधाराचा व कोणी नसल्याचा फायदा घेत गांजा व व्हाईटनरचे खुलेआम सेवन केले जात आहे.
शहरात सहजरित्या १० ते ५० रुपयात गांजा, व्हाईटनर,,स्टीकफाँस्ट मिळत असल्याने शहरातील अल्पवयीन तरुनाई नशेच्या आहारी जात आहे.
गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगार किंवा काही गुंडांपुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण वाढत आहे. सहजरित्या शहर आणि ग्रामीण भागात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने परिसरांत १४ ते १८ वयोगटांतील शालेय मुले याच्या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे.
सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बरबाद करणारी आहे.
शहरातील काही ठिकाणे गांजा विक्रीसाठी तर कांही ठिकाणच नशा करण्यासाठी प्रसिध्द असल्यासारखी स्थिती आहे.
गांजा पिणारे अनेकजण शहराच्या मध्य वस्तीत बसून दररोज नशेच्या आहारी जात आहेत कांही ठिकाणी समुहाने बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकरणी संबंधित यत्रणेकडून अशा लोकांनी कारवाई होताना दिसत नसुन अनेक वेळा सांगितले तरी ठोस कारवाई होत नाही.
गांजा तयार करणाऱ्या तसेच तस्करी ठरणाऱ्या किंवा विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल, अशा कारवाईची गरज आहे.
अग्दी सहजरित्या मिळत असलेल्या (गांंजा)अंमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण कोवळ्या वयाती मुलांत अधिक वाढत आहे.
मुलांसोबत चुकीच्या संगतीचा किंवा पिअर प्रेशरमुळे देशाची उज्ज्वल पिठी या नशेच्या आहारी जाता आहे.
यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
तरी पोलिस प्रशासणाने या बाबीची गंभीर दखल घेवून गांजा विक्रीवर आळा घालावा अशी मागणी युवकांनी लोहा पोलिस स्टशनमध्ये दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.