राज्यपालांच्या हस्ते श्रीरामपूर रेड क्रॉसला मेरिट अवॉर्ड प्रदान - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 21, 2022

राज्यपालांच्या हस्ते श्रीरामपूर रेड क्रॉसला मेरिट अवॉर्ड प्रदान

मुंबई राजभवनात शानदार सोहळा 

शौकतभाई शेख 
श्रीरामपूर प्रतिनिधी
जागतिक शांतता,सुरक्षितता व मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र सेवाकार्य करणाऱ्या जागतिक रेड क्रॉस सोसायटीच्या श्रीरामपूर शाखेला सन 2019-20 व 2020-21 या वर्षात केलेल्या कार्याबद्दल मुंबई येथील राजभवनात महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मेरिट अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील राजभवनात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात सन 2019-20 चा मेरिट अवॉर्ड श्रीरामपूर रेडक्रॉस सोसायटी अध्यक्ष प्रांताधिकारी अनिल पवार यांनी तर सन 2020-21 चा मेरिट अवॉर्ड सचिव सुनील साळवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते स्वीकारला.
श्रीरामपूर रेड क्रॉस ने अल्पावधीमधे अहमदनगर जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, जनजागृती, सुरक्षितता, बालसंगोपन,आदी क्षेत्रात प्राधान्याने काम केले.
विशेषतः कोरोना साथीच्या आजाराचे प्रसंगी जिल्ह्यातील आरोग्य सेवक दवाखाने, फ्रंट वर्कर आदींना सुरक्षेचे साहित्य, जागतिक स्तरावरील आलेली मदत, खाद्य पदार्थ,गृहपायोगी आवश्यक वस्तू आदींचे गरजूंना वाटप करण्यात आले होते. 
आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी केलेल्या कामासाठीच रेड क्रॉस सोसायटीला मेरिट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे . 
भविष्यात जिल्ह्यात गरजूंना आरोग्य विषयक सुलभ सुविधा देण्यासाठी रेड क्रॉस विविध उपक्रम राबविणार असल्याचे सचिव सुनील साळवे यांनी सांगितले. समाजसेवेच्या या पवित्र कार्यामध्ये युवक, युवती व समाजसेवेची आवड असणाऱ्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष अनिल पवार, सचिव सुनील साळवे यांनी केले आहे.
 राजभवनात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील रेड क्रॉस चे सर्व पदाधिकारी,सरकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटीचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने,आमदार लहू कानडे, ए.डी सी.बँकेचे संचालक युवा नेते करण ससाणे,रयत बांधकाम समिती चेअरमन प्रकाश निकम,रयतचे सहायक विभागीय अधिकारी काकासाहेब  वाळुंजकर ,श्री.शिवाजी तापकीर ,
विजयराव बनकर, प्राचार्य के.एच .शिंदे,प्राचार्य निंबाळकर सर,प्राचार्य मुकुंद पोंधे, मुख्याध्यापक दिलीप नाईक, डॉ.बाबुराव उपाध्ये, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,मंजू जगधने,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 
रेड क्रॉस चे कार्य उत्कृष्ठपणे पार पाडणेसाठी अध्यक्ष अनिल पवार,उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे,पोपटराव शेळके,प्रवीण साळवे,भरत कुंकुलोळ ,श्रावण भोसले,सुखदेव शेरे,सुरेश वाघुले,सागर जावळे, बदर् शेख, बन्सी फेरवाणी,संदीप छाजेड, राजू केदारी,नानासाहेब मुठे, अरुण कटारे,विनीत कुंकुळोळ, बाळासाहेब पाटोळे, साहेबराव रक्टे,प्रेमनाथ सोनुने, सुरंजन साळवे,पराग कारखानीस,उल्हास मराठे,प्रकाश देशमुख,विनोद हिंग्निकर, सोपान नन्नवरे,विश्वास भोसले,नितीन राऊत,किरण सोनवणे,संजय दुशिंग, साईलता सामलेटी,शोभा शेंडगे, प्रो.सुप्रिया साळवे,सविता साळुंके,वर्षा दातीर,सौ.तोरणे,सौ. खान,उमेश अग्रवाल,केशव धायगुडे,महेंद्र काळंगे,कांतीलाल शिंदे, बाळासाहेब पाटोळे,नितीन राऊत,बाळासाहेब सोनटक्के, राजू कुलकर्णी,देविदास दळवी, डॉ.मॅक त्रिभुवन,सुषमा कांबळे, लहानू त्रिभुवन,आदी परिश्रम घेत आहेत.