प्रतिनिधी
संजय महाजन
135 वा कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून र.शि. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी बोलताना,कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी,खेडोपाडी पोहोचवली आणि खऱ्या अर्थाने कर्मवीरांमुळेच आम्हाला शिक्षणाचा खरा अर्थ कळाला असे प्रतिपादन यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पढेगाव ता. श्रीरामपूर येथील व्याख्यानात बोलताना केले.
त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटलांनी र.शि.संस्थेच्या माध्यमातून समाज जागृतीचे महान असे कार्य केले.आज रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील एक नामवंत शिक्षण संस्था म्हणून शैक्षणिक कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान देते आहे. आज लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत...यावेळी यशवंत शिक्षण सेवा मंडळ,(माजी विद्यार्थी संघटना)पढेगाव यांनी विद्यालयाला दिलेली रू.2 लाख 35 हजार किमतीची सोलर सिस्टिमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पाचवी ते बारावी पर्यंतच्या,स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,अनेक देणगीदारांनी विद्यालयाला भरघोस अशी देणगी दिली त्यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य के.वाय.बनकर साहेब होते,प्रमुख पाहुणे रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने सह व्यासपीठावर स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अच्युतराव पा.बनकर,अण्णासाहेब पा. बनकर,बापूसाहेब काळे,माजी प्राचार्य शिवाजीराव लबडे, सरपंच किशोरनाना बनकर,वि.का.सोसा.चे चेअरमन रणजीत पा.बनकर, सेजल इंडस्ट्रीजचे जितेंद्र तोरणे,रयतचे माजी विभागीय अधिकारी झडे साहेब,रमेश आढाव यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्राचार्य संजय आढाव यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार पर्यवेक्षक अजिजभाई शेख यांनी केले.राजेंद्र धरम यांनी सूत्रसंचालन केले.