प्रतिनिधी
कमलेश शेवाळे
अहमदनगर : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाने आपण 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा व्हावा म्हणून स्वराज्य संघटनेतर्फे 14 सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते.
त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आज 28सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून तहसील कार्यालयात प्रसन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते व पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक कार्यक्रमास उपस्थित होते आणि सौ धनश्री उत्पात महाराष्ट्र संपर्कप्रमुख यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.
व संघटनेबद्दल व माहिती अधिकार याबद्दल माहिती दिली व तहसीलदार साहेबांनी आपले निवेदन मान्य करून कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राम बडवे यांनी सुद्धा संघटनेची माहिती दिली आणि कसे कार्य आहे ते सांगितले व डॉ सौ ज्योती मॅडम सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यांनीही सगळ्यांचे आभार मानले.
यावेळी तालुका अध्यक्ष ढोबळे साहेब यांनी धन्यवाद दिले व महिला आघाडीच्या सौ नीता मॅडम पण उपस्थित होत्या तहसीलदार श्री बेलेकर साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केले व आपल्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले व आपल्याला धन्यवाद दिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले आहेत.