लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा दि. १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यात येणार असुन या यात्रेला लोहा व कंधार तालुक्यातून १०हजार कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास मोरे, लोहा तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ यांनी लोहा येथील काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना केले आहे.
लोहा येथील विठाई कॉम्प्लेक्स येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा निमित आज दि. २९ सप्टेंबर रोजी लोहा व कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास मोरे, लोहा तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ, कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार , काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर , माजी नगरसेवक उत्तम महाबळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, माजी नगरसेवक बाबुभाई कुरेशी, माजी नगरसेवक पंकज परिहार, माजी नगरसेवक अनिल दाढेल ,माजी पं.स. सदस्य डॉ.गवळी , माजी सरपंच आर आर पाटील, युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर , विक्रांत नळगे, श्रीकांत पवार, भूषण दमकोडवार,पांडू शेटे, अशोक मेकाले, खादर भाई शेख , माजी सैनिक व्यंकट घोडके , यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास मोरे, तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी प्रास्ताविक केले
तसेच यावेळी माजी जि. प. व पं. स. सदस्य श्रीनिवास मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.