शासना मार्फत पशु संवर्धन विभागात चुकीच्या पध्दतीने झालेली पर्यवेक्षक पद भरती रद्द करण्याची मागणी - JDM

JDM


Breaking

Thursday, September 29, 2022

शासना मार्फत पशु संवर्धन विभागात चुकीच्या पध्दतीने झालेली पर्यवेक्षक पद भरती रद्द करण्याची मागणी

पशुधन प्रर्यवेक्षक कंत्राटी पदाची बोगस भरती रद्द करण्याची मागणी
लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल

राज्य शासण व पशुसंवर्धन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे व  सिनर्जीज सोल्युशंन प्रा.लि.या कंपनीच्या वतीने जाहिरात न देता व परीक्षा ही न घेता कंत्राटी पशुधन प्रर्यवेक्षकाची बोगस व नियमबाह्य भरती करण्यात आली असुन,ती भरती रद्द करुन नव्याने जाहिरात देवून परीक्षा घेवून तसेच सेवेतील सेवादात्याना प्राधान्य देवून ही भरती प्रक्रिया पुर्ण करावी अशी मागणी केली आहे.
      राज्य शासणा व  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात सिनर्जीज सोल्युशन प्रा.लि या कंपनीस कंत्राटी पशुधन प्रर्यवेक्षक करतीचे कत्राट दिले असुन, या कंपनीने मागिल दोन दिवसापुर्वी कसल्याप्रकारे जाहिरात न देता व परीक्षा ही न घेता पशुधन प्रर्यवेक्षक पदाची नियमबाह्य व चुकीच्या पध्दतीने आपल्या मर्जीतील लोकांनाची पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी पदी भरती केली असुन मागिल काळात  सेवादाते म्हणुन काम करणाऱ्या वर अन्याय आहे या आशयाचे १)जाभंळीकर सुभाष हनमंत २) उलगुलवाड माधव ३)देवके राजेश्वर यांनी पशु संवर्धन मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
      राज्य शासण व पशु संवर्धन विभागाच्या चुकीच्या धोरणा मुळे व संबधीत सिनर्जीज सोल्युशंन प्रा.लि.या कंपनीच्या ना जाहीरात ना परीक्षा या मनमानी पध्दतीने व आपल्याच मर्जीतील पशुधन प्रवेक्षक पदाच्या भरती करुंण लंम्पीसह व इतर संसर्ग रोगात २०१२ पासुन तत्पर राहत सेवा देणारे सेवादात्यावर अन्याय असुन  केलेल्या सेवादात्याना प्राधाने देण्याची गरज असताना ही सदरिल सिनर्जीज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने कोनत्या पध्दतीची जहिरात  किंवा परीक्षा न घेता आपल्या मर्जीतील लोकाना पशुधन प्रर्यवेक्षक पदावर भरती करुन घेतले आहे. सदरिल भरती हि बोगस पध्दतीने  झाली असुन ही भरती रद्द करुन नव्याने जाहिरात व परीक्षा घेवून जुन्या सेवादात्याना प्राधान्य देण्यात यावे या मागणी साठी 
१)जाभंळीकर सुभाष हनमंत 
२) उलगुलवाड माधव 
३)देवके राजेश्वर यांनी पशु संवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी नांदेड जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी नांदेड यांना दिलेल्या नमुद केले आहे.