प्रति माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहा तालुक्यातील पोलेवाडी गडावर सुप्रसिध्द श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ - JDM

JDM


Breaking

Thursday, September 29, 2022

प्रति माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहा तालुक्यातील पोलेवाडी गडावर सुप्रसिध्द श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

श्री रेणुका देवी चे दर्शन घेण्यासाठी व यात्रेसाठी  भाविक भक्तांची मांदियाळी
श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सवाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा  संस्थापक अध्यक्ष एन.एन. देशपांडे व कोषाध्यक्ष बी.एल.शकरवार 
---------------------------------------
लोहा /प्रतिनिधी संगम पवार 

प्रति माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहा तालुक्यातील पोलेवाडी गडावर सुप्रसिध्द श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला असुन श्री रेणुका देवी चे दर्शन घेण्यासाठी व यात्रेसाठी हजारो भाविक भक्तांची मांदियाळी झाली आहे.
साडेतीन पीठापैकी  एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील श्री रेणुका देवी चे मंदिर हे एक  पुर्ण पिठ आहे.
माहूर येथील श्री  रेणुका देवी चे मंदिर हे लोहा येथून फार दूर असल्यामुळे  लोहा तालुक्यातील गोरगरीब जनतेला , भाविक भक्तांना माहूर येथे जाऊन श्री रेणुका देवीचे दर्शन घेणे मोठे खर्चिक बाब असल्यामुळे श्री रेणुका देवी चे परम भक्त असलेले  एन.एन. देशपांडे,  बी. एल. शंकरवार ,माजी जि. प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे महाराज यांनी लोहा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील पोलेवाडी येथील डोंगरावर (गडावर) १९८५ ला माहूर येथील श्री रेणुका देवीची स्थापना केली व लोहा -कंधार,पालम, अहमदपूर तालुक्यातील भाविक भक्तांना अगदी नजिक  श्री रेणुका देवी मातेचे दर्शन घेण्याची सोय झाली व  पोलेवाडी येथील श्री रेणुका देवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एन.एन. देशपांडे, बी. एल . कोषाध्यक्ष बी.एल. शकरवार यांनी गेल्या ३७ वर्षापासून पोलेवाडी गडावर नवरात्र महोत्सवात श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सव सुरुवात केली असून या नवरात्र महोत्सवास दरवर्षी प्रचंड प्रमाणात भाविक भक्तांचा प्रतिसाद मिळाला असुन पोलेवाडी गडावरील श्री रेणुका देवी देवच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येतात नवस बोलतात नवसाला पावणारी श्री रेणुका देवी म्हणून ही श्री रेणुका देवी प्रसिद्ध आहे.
 यंदा पोलेवाडी येथील श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सवाचे ३७ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलेवाडी येथील श्री रेणुका देवी नवरात्र महोत्सव निमित्त भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व यात काही कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत तर काही कार्यक्रम   विजयादशमी पर्यंत संपन्न होणार आहेत.
यात संपन्न झालेले व होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे दि. २६-९-२०२२ रोजी सकाळी घटस्थापना करण्यात आली व रात्री ८ ते १० हभप आत्मराम महाराज कवडे यांचे हरि किर्तन संपन्न झाले, दि. २७-९-२०२२ रोजी  सकाळी देविच्या आराध्याचा मेळावा संपन्न झाला तर रात्री ८ ते १०हभप मारोतराव महाराज हिपरगेकर यांचे हरि किर्तन संपन्न झाले.,  दि. २८-९-२०२२ रोजी   सकाळी जि.प. प्रा. शाळा पोलेवाडी येथील इयत्ता १ली ७ वी  पर्यंतच्या  विद्यार्थ्यांची कब्बडी स्पर्धा संपन्न झाली. तर ८ ते १० हभप  माधव गिते महाराज पोलेवाडीकर   यांचे हरि किर्तन संपन्न झाले आहे.  , दि. २९-९-२०२२ रोजी सकाळी  जि.प. प्रा.शाळा पोलेवाडी  येथील विद्यार्थ्यांनी ची रांगोळी स्पर्धा संपन्न झाली तर रात्री ८ते१० हभप निळोबा महाराज हरबळकर यांचे हरि किर्तन संपन्न झाले., सदरील कार्यक्रम संपन्न झाले आहेत तर पुढे होणारे कार्यक्रम दि. ३०-९-२०२२ रोजी सकाळी श्री रेणुका देवी सार्वजनिक वाचनालय पोलेवाडी च्या वतीने  जि.प. प्रा. शाळा पोलेवाडी येथील इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे तर रात्री ८ ते १० हभप दिपक महाराज महाराज शेवरे सिंदगीकर युवा किर्तनकार रामकडा संस्थान यांचे हरि किर्तन होणार आहे, दि. १-१०-२०२२ रोजी सकाळी १२ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यस्मरण निमित्त प्रा. मुरहरी कुंभारगावे सर यांचे व्याख्यान होणार आहे तर रात्री ८ ते १० हभप अप्पाराव पांढरे महाराज बांभुळगाव जि.बीड  यांचे हरि किर्तन होणार आहे., दि. २-१०-२०२२ रोजी महाप्रसाद नांदेडकर मित्र मंडळाच्या वतीने दुपारी १ ते ५ कै. अशोक गोपनर स्मृती क्रिडा महोत्सव कब्बडी चे खुले सामने प्रथम बक्षीस २१०००  रु., द्वितीय बक्षीस  ११००० रु. , तिसरे बक्षीस ५१०० रु.   तर रात्री  गोंधळ लक्ष्मणराव पोखरणीकर यांचे,  दि. ३-१०-२०२२ रोजी सकाळी  भव्य रक्तदान शिबिर तर रात्री होमहवन, दि. ४-१०-२०२२ रोजी सकाळी कुमारिका पुजन तर रात्री देवीच्या आराध्याची गाणी , दि.५-१०-२०२२ रोजी दसरा सिमोलंघन पालखी दुपारी ३.३७ वाजता , रात्री दतमार्गी वैष्णवी भजनी मंडळ पोलेवाडी यांचा गायनाचा कार्यक्रम असे भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ सर्व  भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष एन.एन. देशपांडे , कोषाध्यक्ष बी.एल. शकरवार व समस्त गावकरी मंडळी पोलेवाडी यांनी केले आहे.