अन्सारी समाज बांधवांकडून अंकुश लाड यांचा सत्कार - JDM

JDM


Breaking

Thursday, September 29, 2022

अन्सारी समाज बांधवांकडून अंकुश लाड यांचा सत्कार


मानवत/ उपसंपादक
इरफान बागवान
दि.२९ संप्टेबर रोजी शहरातील राज गल्ली येथील हजाम बावळी परिसरातील अन्सारी समाज बांधवांचे मंगल कार्यालयाचा काम अंतिम टप्प्यात येत असून मंगल कार्यालय समोर सिमेंट रोड व शुशोभीकरण करावा अशी मागणी परिसरातील नागरिक व अन्सारी समाज बांधवांकडून युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्या निवासी स्थानि भेट घेऊन केली त्याचबरोबर अंकुश लाड यांचे समाज बांधवांकडून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आले.
अंकुश लाड यांनी त्यांची समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर ते काम मार्गी लाऊ असा शब्दही दिला.
यावेळी मंन्सूर अन्सारी,अब्दुल रौफ अन्सारी, खयुम अन्सारी,शगिर अन्सारी,खिजर,पाशा अन्सारी, यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
परिसरातील नागरिक यांनी लाड यांचा आभार मानला.