लोहा तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरीक खड्डेमय रस्ते व धुळीने हैराण - JDM

JDM


Breaking

Saturday, September 3, 2022

लोहा तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरीक खड्डेमय रस्ते व धुळीने हैराण

__________________________________
तहसील परीसरातील काम तातडीने चालु करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन
__________________________________
नांदेड प्रतिनिधी
किरण दाढेल
लोहा - कंधार लोहा महामार्गावरील छञपती शिवाजी महाराज चौकापासुन रस्त्याचे काम बंद पडले असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन त्या परीसरात ग्रामीण भागातुन येणारे प्रवासी , तहसील कार्यालय , आश्रम शाळा , व्यापारी , विद्यार्थी , व या मार्गावरील राहणारे निवासी यांना या रस्त्यावरील मोठ मोठे खड्डे व खड्यातुन उडणाऱ्या धुळीचा जिवघेणा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची ये-जा असते त्यामुळे या अवजड वाहनांच्या मागे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत यांचा प्रचंड त्रास लोहा वासीयांना करावा लागत आहे. 
 या धुळीमुळे नागरीकांना मोकळा श्वास पण घेता येत नाही अनेकांना श्वासाचे आजार पण होत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने लोहा येथील तहसीलदार , सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाव्दारे केली आहे.
तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागातही रस्त्यांचा प्रश्न जैसा थे दिसल्याचे चित्र दिसुन येत आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने गुतेदाराच्या संथगतीने चालत असलेल्या कामामुळे सामान्य जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार यातुन दिसुन येत आहे संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास दि १२-०९-२०२२ रोजी वंचीत बहुजन आघाडी लोहा शाखेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.