महापुरुषांच्या विचारानेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून : सरोदे - JDM

JDM


Breaking

Sunday, September 4, 2022

महापुरुषांच्या विचारानेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून : सरोदे

शिर्डीत विराट प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक
शिर्डीत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने घडले एकात्मतेचे दर्शन

शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन
सालाबादप्रमाणे विराट प्रतिष्टान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने फटाकड्याच्या अतिषबाजी मध्ये श्रीराम प्रभू छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महान पुरुषांच्या भव्य मिरवणुकीने शिर्डीकरांचे लक्ष जणू काय वेधून घेतले होते सायंकाळी 7 वाजता सनई सुरांच्या वाद्यात महापुरुषाना फुल हार अर्पण करून अण्णाभाऊ साठे चौकातून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीला कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे व्हा.चेअरमन रमेश घोडेराव शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आर.पी.आय चे दीपक गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरानी सदर जयंती सोहळ्याला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या नगर जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याबाहेरून नाशिक जालना गंगापूर मनमाड वैजापूर शिरपूर औरंगाबाद आदी जिल्ह्यातूनही सामाजिक कार्यकर्त्यांनी या जयंती सोहळ्याला हजेरी लावली आलेल्या सर्व मान्यवरांच विराट प्रतिष्टान चे संस्थापक प्रदीप सरोदे यांनी सम्मान केला या कार्यक्रमाला अनेक वक्त्यांनी अण्णांभाउ च कार्य सातासमुद्रापलिकडे असल्याने त्यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न देऊन सम्मान करावा अशी मागणी केली तर या कार्यक्रमाला गजानन तोरे अमोल जगताप नगरसेवक संतोष अहिरे दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप विजय वडागळे नगरसेवक शैलेश चव्हाण प्रभू बागुल प्रदीप बनसोडे भैया पाटील निलेश लाडवणी सरपंच साहेबराव पडवळ पत्रकार विलास म्हस्के बंटी साठे भाजपचे शिवाजी थोरात यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली या कार्यक्रमासाठी शिवाजी आरणे वसंत भोंडगे प्रसाद कोते किरण कोते प्रकाश गोंदकर शाहू वडागळे निलेश शेंडगे संजय पवार निलेश सरोदे यांच्यासह सर्व विराट प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन कांबळे यांनी केले तर आभार रामभाऊ पिंगळे यांनी मानले शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

महापुरुषांच्या विचारानेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून: सरोदे
साईबाबा मुळे सर्व देशवासियांना श्रद्धा सबुरीचा संदेश रुजलेला आहे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे व महापुरुषांच्या विचाराने महाराष्ट्र चालत आहे या विचारधारेमुळेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे असे यावेळी मोलाचे उद्गार प्रदीप सरोदे यांनी काढले.