अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शुक्रवारी रात्री दत्तराव घुगे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी करत असताना, घरातील महिला आजीने चोरांना पाहिले असता, दत्तराव घुगे यांना सांगितले असता दत्तराव यांनी आजुबाजूच्या व गावातील काही मित्रांना फोन केले.
या वेळी गावातील युवक येथे आले. तर एका चोराला घरामध्ये बंद केले तर दुसरा चोराला पकडले असता दत्तराव घुगे यांना डोक्यावर धारधार चाकूने वार केला. तरी सुद्धा या चोराला न सोडता या दोन्ही चोराला पकडून चागला चैप गावकऱ्यांनी दिला तर या मध्ये तिन चोरटे पळून गेले.
या अगोदर सुध्दा याच घरी एक महिना अगोदर लाखो रूपयांची चोरी झाली होती.
घटनेची माहिती मेडशी पोलीस व मालेगाव पोलीस यांना देताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. व दोन्ही चोराला मालेगाव पोलीसांनी ताब्यात घेऊन मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये नेले. व पुढील तपास ठाणेदार किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.