मंदाताई वाघमारे यांच्या घरी धम्मग्रंथाचे वाचन समारोप - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 7, 2022

मंदाताई वाघमारे यांच्या घरी धम्मग्रंथाचे वाचन समारोप

सहसंपादक 
अजय चोथमल
रिसोड - येथे दि. ६ सप्टेंबर मंगळावर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस मंदाताई वसंतराव वाघमारे यांच्या घरी "भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या" धम्मग्रंथाचे वाचन सुरू होते त्या ग्रंथ वाचणाचा आज समारोप करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष शालिग्राम पठाडे, जिल्हा अध्यक्षा संध्याताई पंडित होते. प्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्रिशरण, पंचशील, बुद्ध पुजा घेण्यात आली. या प्रसंगी शालिग्राम पठाडे यांनी ग्रंथ वाचण्याचा उपक्रम राबविल्या बद्दल अभिनंदन केले.व ग्रंथ वाचणांचे महत्व सांगितले. या ग्रंथात सिद्धार्थ राजकुमार ते सम्यक समबुद्ध, होईपर्यंत इतिहास जन्म, गृहत्याग, धम्म हा सर्वांनी वाचावा हा ग्रंथ डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित असल्याने तो समाजासाठी होकायंत्र दिशादर्शक आहे.त्याचे अनुकरण करावे असे आवाहन केले. संध्याताई पंडित, प्रमिलाताई शेवाळे, देविदास सोनुने यांनीही धम्मग्रंथ वाचुन त्याचे अनुकरण करून समाजाची प्रगती करून घ्यावी. या प्रसंगी उपस्थित मंदाताई धांडे, सिंधुताई वानखेडे, आनंदी पंडित, संगिता तुरेराव, गु़फाबाई इंगोले, महानंदा वाठोरे, मिनाताई चव्हाण, यशोदाबाई वाकोडे, सुजाता खरात, प्रयाग बाई सुर्यवंशी, माया गवई, अर्चना अंभोरे, मीनाताई अंभोरे, शकुंतला वानखेडे हे उपस्थित होते. शेवटी सरणंतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.