संजय महाजन
शिर्डी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे गणेश उत्सवानिमित्त युवा नेते नानासाहेब शिंदे व पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी नानासाहेब शिंदे म्हणाले की,
आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही आरतीचा मान दिल्यामुळे तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो व माझे वाढदिवस या शाळेत करत असतो
तरी सामाजिक संघटनेने या अनाथ मुलांसाठी वाढदिवस असो व इतर कोणतेही कार्यक्रमासो येथे अनाथ मुलांबरोबर साजरा करावा व त्यांना आर्थिक मदत करावी असे आव्हान नानासाहेब शिंदे व पत्रकार संजय महाजन यांनी केले.