अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील ग्राम कोळदरा ये दि. 5 सप्टेंबर रोजी येथील महिला सिंधुबाई राजु लठाड या विहरी मध्ये पडल्या आसता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कोळदरा येथील वर्ग आठवी मध्ये शिकत आसलेली कु. कोमल श्रीकृष्ण ठाकरे हिने विहरी मध्ये दोर टाकून महिलेचे प्राण वाचविले या मुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कोळदरा येथील शिक्षकांनी व शाळेच्या वतीने कु. कोमल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी नितीन गोरे सर, श्री नागलकर सर, सिरसाट मॅडम, चव्हाण मॅडम, शर्मा सर यांनी या वेळी कु कोमल श्रीकृष्ण ठाकरे यांच्या सत्कार केला तर शाळेतील विद्यार्थीनी स्वागत केले.