महामहीम राज्यपालांना शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
शौकतभाई शेख
प्रतिनिधी श्रीरामपूर:
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्री.सुभाषचंद्र तथा भाई मयकर यांना विधान परिषद सदस्य म्हणून समावून घेण्याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबईतील "वर्षा" या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महामहीम राज्यपाल महोदय यांच्याकडे सदरील बाबी शिफारस करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
श्री.सुभाषचंद्र तथा भाई मयेकर (ज्येष्ठ साहित्यिक आणि मा. विधानभवन उपसचिव, महाराष्ट्र) यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात महामहीम राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य यांना शिफारस करावी अशी मागणी करून "अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ" पदाधिकाऱ्यांनी सविस्तर मागणीचे निवेदन दिले आहे.
श्री.सुभाषचंद्र तथा भाई मयेकर यांना राजकीय, प्रशासकीय क्षेत्राचा चांगला गाढा अनुभव असल्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये श्री. सुभाषचंद्र तथा भाई मयेकर यांच्या हजरजबाबी आणि राजकीय कायदेविषयक सखोल अभ्यास असून कोणत्याही राजकीय प्रश्नावर त्यांचे उत्तर तयार असते.
श्री. सुभाषचंद्र तथा भाई मयेकर यांनी दिवंगत गोपीनाथराव मुंडे तसेच नारायणराव राणे यांच्या उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री कालावधीत त्यांच्या सोबत काम केले आहे.
सोबतच श्री. मयेकर यांनी विधानपरिषद महाराष्ट्र उपसचिव म्हणून प्रशंसनीय काम केलेले आहे.
महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे आजी / माजी आमदार श्री. मयेकर यांच्याशी बिकटप्रसंगी सल्लामसलत करत असतात, याची माहिती सर्व पक्षीय मंत्री तथा आमदार यांना आहे.
राजकीय / प्रशासकीय वातावरणात कलेची जोपासना त्यांनी केली आहे.
श्री.मयेकर यांचे कथा,कविता संग्रह प्रकाशित झालेली आहेत,
तसेच त्यांची गीतेही प्रदर्शित झाली आहेतच. म्हणून श्री.भाई मयेकर यांची कला / साहित्य क्षेत्रातील, उच्चविद्याविभूषित कार्यतत्पर व्यक्ती विधानपरिषद मध्ये असावी असा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचा आग्रह असून त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे प्रस्ताव देण्यात आला असल्याचे अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री. देवेंद्र मोरे,आशुतोष गोरे, महेश बनसोडे, राजेंद्र बोडारे, हेमांगी, पूनम पवार, प्रमोदचंद्र नाईक, गोपीनाथ वाघमारे,बाळासाहेब गोरे आदि उपस्थित होते.