सत्यमेव जयते बँकेचे वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात संपन्न - JDM

JDM


Breaking

Tuesday, September 13, 2022

सत्यमेव जयते बँकेचे वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात संपन्न

सत्यमेव जयते बँकेचे सामाजीक उपक्रम अतिशय कौतुकास्पद-अंकुशराव पडघान

बुलढाणा प्रतिनिधी 
समाधान पदमणे
 दि.11 सप्टेंबर रोजी सत्यमेव जयते बँकेच्या वतीने ५ वी वार्षिक भव्यदिव्य आमसभा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली होती या आमसभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्वेताताई महाले पाटील आमदार, चिखली विधानसभा मतदार संघ यांचे वडील मा.अंकुशराव पडघान पाटील तसेच प्रमुख उपस्थिती मा.प्रल्हादभाऊ बरबडे मा.संतोष काळे पाटील ता.अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चिखली मा.नितेशजी थिगळे साहेब राज्य युवा परिषद महाराष्ट्र वा C.M.D. सत्यमेव जयते प्युअर इको ऑईल प्रा.लि.मा.डॉ.वसंतराव चिंचोले विबोले हॉस्पिटल, बुलडाणा प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.जी.एम.कडाळे सत्यमेव जयते बँकेच्या अध्यक्षा मा.कांताबाई अरविंद शेळके,मा.अरविंद शेळके मंडळ अधिकारी,चिखली मा.विष्णुपंत तुकाराम पाटील संस्थापक अध्यक्ष.श.शि.व. पु.क.संस्था.चिखली,दत्ता उमाळे-पत्रकार, समाधान पदमणे-पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते,सतिश मवाळ -पत्रकार व इतरही असंख्य पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.सर्वप्रथम दीपप्रजवल करून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ तसेच झाड देऊन स्वागत करण्यात आले त्यांतर सत्यमेव जयते बँकेचे सर्व कर्मचारी,खातेदार,सभासद व इतरही सामाजीक कार्य करण्याऱ्या समाधान पदमणे पत्रकार व सामाजीक कार्यकर्ते, सतिश मवाळ पत्रकार यांचे सह अनेकांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव पडघान पाटील ,संतोष काळे,संस्थेच्या अध्यक्षा कांताताई शेळके,भास्कर मोरे,प्रल्हाद बरबडे,समाधान पदमणे यांनी आपले विचार मांडले व सर्वांनी सत्यमेव जयते बँकेच्या आजपर्यंत च्या कार्याबद्दल अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा दिल्या.सभासदांनी कार्यक्रमाला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितेश थिगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अरविंद शेळके यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सत्यमेव जयते चे सर्व टीम ने परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता भोजन करून करण्यात आली होती.