शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
श्री मार्तंड म्हाळसापती आओ साई खंडोबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने श्री म्हाळसापती भगत यांची शताब्दी पुण्यतिथी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली.
पाच दिवस चाललेल्या या शताब्दी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
तर पाचव्या दिवशी श्री खंडोबा मंदिरातून श्री म्हाळसापती महाराज यांच्या प्रतीमेची भव्य शोभायाञा काढण्यात आला.
या शोभायाञेत विविध राज्यातील भाविकांनी सहभाग नोंदवला..यावेळी पिवळ्या रंगाचे वस्ञ परिधान करुन येळकोट येळकोट जय मल्हार , साईनामाचा गजर करत करत श्री म्हाळसापती भगत समाधी येथून श्री साईबाबा मंदिरात प्रथेनुसार श्री साईबाबा व परममभक्त श्री म्हाळसापती यांची भेट घडवण्यात आली.
तर श्री म्हाळसापती भगत यांच्या समाधी स्थळापासून श्री खंडोबा मंदिरापर्यंत भव्य शोभायाञा काढण्यात आली..महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तीन दिवस चाललेल्या विष्णू यागाची सांगता करण्यात आली..श्री खंडोबा मंदिर येथे साईभजन गायक प्रवीण महामुनी यांच्या साईभजन संध्या कार्यक्रमात भाविकांनी एकच जयघोष करत साईनामाचा गजर करत भाविक भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले. याप्रसंगी पाच दिवस चाललेल्या शताब्दी पुण्यतिथी सोहळ्यात परिश्रम घेतलेल्या मान्यवरांचा आणि कलाकारांचा आओ साई खंडोबा ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री मार्तंड म्हाळसापती आओ साई खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष संदिप नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, विश्वस्त दिपक नागरे, अशोक नागरे , निलेश नागरे , श्रीकांत नागरे आदीसह नागरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.