उपसंपादक :
इरफान बागवान/ मानवत
मानवत पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर रोजी रोजी नवरात्र महोत्सव निमित्त शांतता बैठक चे आयोजन मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सविस्तर वर अशे की, 26 सप्टेंबर सोमवार पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव (घटस्थापना) मानवत शहरातील तालुक्यातील दुर्गा माता महोत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच तालुक्यातील पोलीस पाटील व शहरातील प्रतिष्ठित नागरिक माजि.नगरसेवक हबिब भडके,शंकर कच्छवे, यांच्यासह अदिची उपस्थिती होती.
त्या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांना पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी काही सूचना दिल्या नवरात्र महोत्सव शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखून पार पाडावा, महोत्सव साठी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दिलेल्या वेळेत विसर्जन मिरवणूक पार पाडावी मानवत तालुक्याचा नवलैकिक वाढवावा, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवावे, जातीय सलोखा राखावा, सर्वांच्या धर्मांचा सन्मान करावा, आरोग्य विभागाच्या वतीने राबवित येणाऱ्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाची जनजागृती करावी, ध्वनी प्रदूषण टाळावे, आरोग्य शिबिर घ्यावे, मिरवणुकीमध्ये डी.जे चा वापर करू नये अशी सूचना दिल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव उपनिरीक्षक रमेश गिरी,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये सूत्रसंचालन सदाशिव होंगे, यांनी केले.
आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांनी मानले, ही बैठक यशस्वी करण्यासाठी गोपनीय शाखेचे मुंजाभाऊ पायगन,विलास मोरे यांनी परिश्रम घेतले.