अशोक' मुळे कामगारांचे प्रपंच सुस्थीतीत; सिध्दार्थ मुरकुटे - JDM

JDM


Breaking

Sunday, September 25, 2022

अशोक' मुळे कामगारांचे प्रपंच सुस्थीतीत; सिध्दार्थ मुरकुटे

शौकतभाई शेख
प्रतिनिधी श्रीरामपूर
तालुक्याचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी गेली पस्तीस वर्षे अशोक कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली. बंद पडण्याच्या मार्गावर असलेला कारखाना उर्जितावस्थेत आणला. त्यामुळेच श्रीरामपूर शहराची बाजारपेठ आणि कामगारांचे प्रपंच सुस्थितीत असल्याचे प्रतिपादन मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे यांनी केले.
     अशोक कामगार पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन सोपानराव राऊत, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक रामभाऊ कासार, पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, व्हा.चेअरमन संतोष जाधव, संचालक लव शिंदे, डॉ.मंगेश उंडे, आण्णासाहेब वाकडे, हरिभाऊ गायके, ज्ञानेश्वर मुठे, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, विकास दांगट, दत्ताञय झुराळे, वंदनाताई निकाळजे, लिलाबाई बागडे, कारखाना अधिकारी विक्रांत भागवत, बाळासाहेब उंडे, विष्णुपंत लवांडे, विजय धुमाळ, कृष्णकांत सोनटक्के, रमेश आढाव आदि उपस्थित होते.
     श्री.मुरकुटे म्हणाले की, कामगारांनी संस्थेबाबत आत्मियता राखली पाहिजे. संस्था बंद पडली तर काय दूरवस्था होते हे परिसरातील बंद पडलेल्या कारखान्यांवरुन समजते. माजी आ.मुरकुटे यांनी १९८७ साली प्रतिकुल परिस्थीतीत कारखान्याची सूञे स्वीकारली. आज अशोक कारखाना जिल्ह्यातील नामांकित कारखान्यांच्या पंक्तीत आला आला आहे, याचे श्रेय माजी आ.मुरकुटे यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि आजवरचे संचालक, अधिकारी व कामगारांना जाते असे ते म्हणाले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड यांनी केले. दत्ताञय झुरळे यांनी अहवाल वाचन केले. लव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.