अजय चोथमल
मालेगाव येथे बाल विकास प्रकल्प अधीकारी मालेगाव श्री मदन नायक यांनी या महिन्यात पोषण उपक्रमाची अमलबजावणी प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे सांगितले. महिला व बालकांचे स्वास्थ, पोषण व शिक्षण, आदिवासी भागातील महिला व बालकांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ बनवणे, पोषण अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांचे निर्देशानुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण श्री संजय जोल्हे यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तरीय पोषण महिन्याची सुरुवात दि. 1 सप्टेंबर रोजी मालेगाव प्रकल्पातून करण्यात आली.
यावेळी मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण श्री संजय जोल्हे सर व निती आयोगाचे विकासात्मक भागीदार पिरामल फाउंडेशन कडून श्री दिगंबर घोडके, जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई राऊत, पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती घोडे ताई, गटविकास अधिकारी श्री किशोर काळपांडे, पंचायत समिती सदस्य श्री रवींद्र भाऊ देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री काळे तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांचे उपस्थितीत पार पडला. या वेळी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.