अजय चोथमल
मालेगाव येथे दि. 3 सप्टेंबर शनिवारी 2022 वेळ 4: 30 वाजता ठिकाण माहेश्वरी भवन मालेगाव येथे शांतता समितीची मिटींग होणार आहे असे थानेेदार कीरण वानखडे यांनी सांगितले आहे.
ज्या प्रमाणे मोहरम, कावड पोळा हे सण शांतता व सुव्यवस्थेत साजरा करुन पोलीस प्रशासनास सहकार्य केले. त्याच प्रमाणे आगामी गणेशोत्सवात सुध्दा आपले सहकार्य अपेक्षित आहे. गणेश उत्सव संबंधाने मा. श्री. सुनील पुजारी सा. उपविभागीय पोलीस वाशिम हे यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करावा या संबंधाने शांतता समीतीचे मिटींग मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदरचे शांतता समीतीचे मिटींग करीता शहरी, ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सन्माननीय पत्रकार बंधु, मालेगाव शहरातील सन्माननीय प्रतीष्टीत नागरीक,नगरपंचायत चे माजी सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व माजी सदस्य, तसेच सर्व शांतता समीतीचे सदस्य पोलीस मित्र यांनी हजर रहावे हि विनंती. अशी माहिती ठाणेदार किरण वानखडे यांनी दिली आहे.