वाघुंडे परिवाराचा सेवाभाव पाहून 'देव दीनाघरी धावले ; सुखदेव सुकळे - JDM

JDM


Breaking

Saturday, September 17, 2022

वाघुंडे परिवाराचा सेवाभाव पाहून 'देव दीनाघरी धावले ; सुखदेव सुकळे

श्रीरामपूर प्रतिनिधी
शौकतभाई शेख 
आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे, वृद्ध माणूस दुर्लक्षित होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर सुभाषराव वाघुंडे व सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी २०१७ मध्ये माऊली वृद्धाश्रम स्थापन केला.हाती काही नसताना केवळ माणुसकीचा सेवाभाव जपत माऊली वृद्धाश्रमाने गेल्या पाच वर्षात अनेक निराधारांना आधार दिला.
जणू हे निर्मळ कार्य पाहूनच पंढरपूरचे श्रीविठ्ठल रुक्मिणी 'देव दीनाघरी धावले 'आणि स्थिरावले आहेत, असे विचार विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले. येथील माऊली वृद्धाश्रमात श्रीविठ्ठल,रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, हा आनंद व्यक्त करीत सुखदेव सुकळे यांनी स्व.सौ.पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  वृद्धाश्रमातील वृद्धाना आगळी- वेगळी करमणूक लाभावी म्हणून  'वऱ्हाड निघालंय लंडनला'या नाटकाची प्रवेश तिकिटे वाघुंडे परिवार आणि वृद्धाश्रमातील सर्वांना मोफत दिली, 
त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सुभाष वाघुंडे, सौ.कल्पनाताई वाघुंडे, डॉ.बाबुराव उपाध्ये, विद्यानिकेतनच्या शिक्षिका वर्षा धामोरे,सपना रोहन, भायभन्ग, शुभम नामेकर, सुयोग बुरकुले, जयश्री श्रीवास्तव आदी उपस्थित होते.सुखदेव सुकळे व  डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा वाघुंडे परिवाराने सत्कार केला.सुभाष वाघुंडे यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आमच्या कार्याला आशीर्वाद आणि बळ देणारे असून मंदिर उभारणीची वाटचाल सांगितली.सुकळे यांनी श्रीविठ्ठल माऊली प्रत्यक्ष वृद्धाश्रमात आल्यामुळे हे सेवास्थळ भक्तीस्थळ झाले आहे.सामाजिक कार्यात भक्ती असली की सेवेला निर्मळपणा लाभतो, तो येथे लाभला आहे, असे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माऊली वृद्धाश्रमाला मानवसेवेचे तीर्थस्थळ म्हणून वाघुंडे परिवाराचे अभिनंदन करून आता 'माऊली'च माऊलीसाठी धावली आहे,असे डॉ. उपाध्ये यांनी उदगार काढले.सुयोग बुरकुले, शुभम नामेकर, जयश्री श्रीवास्तव यांनी नियोजन केले तर सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.