सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात पालक : शिक्षक संघाची स्थापना - JDM

JDM


Breaking

Saturday, September 17, 2022

सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात पालक : शिक्षक संघाची स्थापना

श्रीरामपूर प्रतिनिधी
शौकतभाई शेख 
येथील के.जे. सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात पालक - शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विजय नगरकर यांनी पालक सभा आयोजित केली,
 या सभेच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे सहसचिव व कार्यकारणी सदस्य रणजीत श्रीगोड हे होते,
यावेळी श्री.श्रीगोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालक व शिक्षकांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागृक राहण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दादा वामन जोशी शाळेतील बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य माणिकराव जाधव,नंदकुमार अंभोरे आदी उपस्थित होते. 
यावेळी शिक्षक - पालक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विठ्ठललराव भांगरे,उपाध्यक्ष मोहनराव बोरावके व सौ.सुनिता शिंदे,सचिव प्रा.श्री. अविनाश राऊत, सहसचिव मोतीलाल व्यवहारे व सौ. सायरा पिंजारी तर सदस्य म्हणून अभय जोर्वेकर, विजय भगत,सौ.अनिता भवार, कैलास देवरे,रवींद्र वढणे, कु. श्रद्धा गौड, सौ. माया जोशी, आनंद चावरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती चित्रा कांबळे यांनी,तर सूत्रसंचालन प्रा.अविनाश राऊत यांनी केले, 
निवड झालेल्या शिक्षक व पालक संघ पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 शेवटी आभार प्रदर्शन प्रा. दिपाली जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाचे फलक लेखन राकेश शिंदे सर यांनी केले, या कार्यक्रमास एकनाथ माळी मामा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.