शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्माला महत्व असते,
प्रत्येकाला अज्ञात आत्मशक्ती प्रेरणा देत असते आणि त्यामुळेच माणूस कार्याला प्रवृत्त होतो.
यशाची इमारत उभी करायची तर त्यासाठी पाया मजबूत असावा लागतो, शिक्षण घेत असताना मानसिक स्वास्थ्य चांगले असावे लागते तसेच विचारात सकारात्मकता असणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन पुण्याचे परमार ग्रुपचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक ईश्वर परमार यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने 'करिअर कट्टा' अंतर्गत आयोजित "विद्यार्थी जीवनातील यशाची गुरुकिल्ली" या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.परमार बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे होते. कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, सचिव सोपानराव राऊत, कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक विरेश गलांडे, सहसचिव भास्कर खंडागळे, पुणे हेल्थ केअरचे बलराम सलुजा, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक बबनराव तागड, डॉ.तौफिक शेख, सोशल सर्व्हिस फौंडेशनचे अध्यक्ष सुरज सुर्यवंशी, प्रविण जमदाडे, प्रियंका यादव, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड यांनी केले तर सोशल सर्विस फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रसन्न धुमाळ यांनी अतिथी परिचय करुन दिला. प्रा.रविंद्र वारुळे यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस प्रा.शिवाजी पटारे यांनी अनुमोदन दिले तर प्रा.सुयोग थोरात यांनी आभार मानले. यावेळी अध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.