लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
जि.प.शाळा जोशीसांगवी शा. व्य. समितीची अध्यक्ष, श्री त्र्यंबक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापसी ( बु.) येथे घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत जोशीसांगवी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थीनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय जोशीसांगवी यांच्या वतीने छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी श्रद्धा मोरे,अजय मोरे व प्रतीक्षा मोरे, धनश्री मोरे या सहभागी विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत कार्यालय जोशीसांगवी वतीने, जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील पालक तिरुपती मोरे यांनी आपले मत मांडताना पालक आणी शिक्षक यांच्यात सुसंवाद व समन्वय आवश्यक असून अशा स्पर्धेचा फायदा आमच्या मुलांना भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी नक्कीच होईल अशा भावना व्यक्त केल्या. तसेच, प्रस्तूत शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी परीश्रम घेतले त्यांचाही यथोचित सत्कार झाला पाहिजे या कृतज्ञ भावनेतून, शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील श्री परमेश्वर थोटे विक्रम पाटील मोरे, तिरुपती पाटील मोरे, सुभाष मरदोडे, मारोती शिंदे, रशीद पठाण, मोहन गोमस्कर,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजू वाघमारे तसेच ग्रामपंचायत समिती सदस्य शिक्षक बांधव पालक आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद गायकवाड यांनी केले असून आभार श्री किसन वाकोरे सर यांनी मानले.