कोपरगाव प्रतिनिधी :
आलोकनाथ पंढरी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनमित्र म्हणून कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकार पर्यटन संचालनालय उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्यामार्फत २७ सप्टेंबर पुरस्कार देण्यात आला.
सुनिल कुलकर्णी , मुलगा चैतन्य कुलकर्णी, बंधू संजय कुलकर्णी यांनी आपल्या १५ ते १६ एकरा मध्ये कृषी पर्यटन स्थळाची निर्मिती करून शेतक-यां पुढे एक आदर्श निर्माण केलाआहे.
लहानपणापासून शेतीव्यवसायाची आवड असणाऱ्या कुलकर्णी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन व संवर्धन केले त्यांना वृक्षां विषय आत्मियता होती. सावळीविहीर येथील शेती कृषीफॉर्म या ठिकाणी विविध फुलझाडे, नारळ,आंबा चिक्कू अशा,जातींचे फळ झाडांची लागवड केली
सुनिल कुलकर्णी यांनी हे कृषी केंद्र पर्यटनसाठी खुले केले असुन अल्पावधीत अगत्य कृषी पर्यटन केंद्र या नावने हे स्थळ महाराष्ट्राच्या कानाकोपयात प्रसिद्ध झाले आहे.
हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी नाशिक,औरंगाबाद, पुणा, या भागातील नागरीक येऊन भेट देत आहेत.