मातंग समाजातील वृद्ध गायरानधारक यांच्या खुन्याना झाली फाशीची शिक्षा - JDM

JDM


Breaking

Monday, September 5, 2022

मातंग समाजातील वृद्ध गायरानधारक यांच्या खुन्याना झाली फाशीची शिक्षा

संपादक : श्री. मयुर साळवे
मातंग समाजातील मौ.सिंगणापुर येथील गोविंद मोतीराम कांबळे जि.परभणी या युवक व साईनगर पिसादेवी जि.औरंगाबाद येथील जर्नाधन कसारे या मातंग वृद्ध गायरानधारक यांच्या खुन्याना फाशीची शिक्षा झाली पाहीजे,या घटनेचा तपास हा स्वतंत्र यंत्रणेमार्फत जलद गतीने पुर्ण करावा,हे दोन्ही आणि अत्याचारी घटनेचे केसेस "फास्ट ट्रँक कोर्टात " चालवावेत,मातंग समाजातील या पिडीत कुटुंबाला शासना मार्फत रू.50.00 लक्ष मदत द्यावी,या दोन्ही कुटूंबाचे पुर्नवसन महानगर पालीका हद्दीत करण्यात यावे,आदी मागण्यासह या व अशा निंदनीय, निर्दयी घटणेच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा "रक्तरंजित महामोर्चा " संपन्न झाला.
परभणी येथील मातंग समाजाचा प्रचंड असा अन्याय-अत्याचारा विरूद्ध चा हा महाराष्ट्रातील पहिला #एल्गार लक्ष वेधक ठरला,या प्रचंड असंतोषाने संपुर्ण परभणी शहर दणाणुन गेले होते,समाजावरील झालेल्या या अन्याया अत्याचारा विरूद्ध च्या लढाईत मनात कुठलाही किंतू-परंतू मनात न बाळगता शहीद गोविंद कांबळे व जर्नाधन कसारे याना न्याय मिळाला पाहीजे,ही प्रांजळ भावना घेवुन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील समाज बांधव,विविध सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
 मोर्चाचे रूपांतर निषेध जाहीर सभेत झाले,यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सरसेनानी विष्णुभाऊ कसबे,मानवहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे,मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद आव्हाड,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष सतिश कावडे, बहुजन क्रांती सेनेचे राधाजी शेळके,राजेश घोडे,लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष, आदिनी आपले विचार मांडले तर या मोर्चाचे मुख्य समन्वयक तथा लाल सेनेचे प्रमुख कॉ.गणपत भिसे यानी सुरुवातीस सविस्तर असे प्रस्तावित करून मोर्चा आयोजना मागील भुमिका जाहीर केली.
वरिल नेत्याच्या व परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी, परभणी याना मोर्चाच्या मागण्याचे निवेदन दिले.
 सकळ मातंग समाज जिल्हा परभणी शहीद गोविंद कांबळे यांच्या हत्येच्या अनुषंगाने एकत्रितपणे जो महाराष्ट्रातील पहिला असा प्रचंड मोर्चा आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना पदाधिकारी व समाज बांधव यांचे विशेष अभिनंदन होताना दिसुन आले .
या मोर्चात इतर सामाजिक संघटने प्रमाणे अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे राज्यउपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, शिवाजी नुरूंदे,नागेश तादलापुरकर,आकाश बुरूडे आदिसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते