अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे दि. 5 सप्टेंबर सोमवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महिलांना दहा दिवस उद्योग व्यवसाय प्रशिक्षण मोफत दिले जाणार असे ब्राह्मणवाडा येथील सरपंच अनिल तायडे
याचा नाविन्यपूर्ण संकल्प, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ब्राह्मणवाडा येथे दहा दिवस महिलांना लघुउद्योग प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रशिक्षणाला उच्चशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याकरिता सरपंच अनिल तायडे यांनी गावातील सर्व सन्माननीय महिला भगिनींना प्रशिक्षणा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान मुलींसाठी व अस्पृश्यासाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दापत्य होय. या प्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरू केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ब्राह्मणवाडा येथे महिलांना दहा दिवसीय उद्योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे येथील सरपंच अनिल तायडे यांनी सांगितले आहे.