अजय चोथमल
मालेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा वाशिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत साहेब वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळी मध्ये आपले जीवन वाहून नेणाऱ्या माता रमाई च्या लेकी धम्मउपाशीका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संसाराचे ओझे वाहत असताना, सोबतच बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना अनुसरून आपले जीवन वाहून नेले.
आणि आपल्या नावा सोबतच आपल्या माहेरच्या व सासरच्या दोन्ही ठिकाणी धम्म चळवळीत अग्रेसर राहून आपले नावलौकिक केले.
अशा माता रमाई च्या धम्म उपाशीकेचा भारतीय बौद्ध महासभा मालेगाव तालुका शाखेच्या वतीने गुणगौरव सत्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याकरिता मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात धम्मपासीका यांच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे.
मालेगाव तालुका सरचिटणीस आदरणीय राहुलजी वानखेडे व विलासजी गुडदे ता.उपाध्यक्ष मालेगाव यांनी गावोगावी जाऊन धम्मउपाशीकेच्या कार्याचा आढावा घेतला आहे.
त्यामधून शिरसाळा, डव्हा, पिपंळदरा, डही, अमानवाडी, उमरदरी, जऊळका, ब्राह्मणवाडा, किन्ही घोडमोड, पांगरी कुठे, मुंगळा, मेडशी, वारंगी आदी गावाचा समावेश आहे.
सोबतच 2021 -22 मध्ये झालेल्या धम्म संस्कार शिबिर व्यसनमुक्ती शिबिर व धम्म प्रवचन मालिकेच्या माध्यमातून ज्या धम्म बांधवांनी सहभाग घेतला होता. असे धम्म बांधव जे व्यसनमुक्त झाले यांचा सुद्धा गुण गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे.
जवळ जवळ मालेगाव तालुक्यातील 22 धम्म बांधव व्यसनापासून मुक्त झाले आहेत. सदर धम्म बांधव धम्म संस्कार शिबिर या शिबिरामध्ये सहभागी होऊन व्यसनमुक्त होऊन धम्ममार्ग आचरण करत आहेत. व आपल्या कुटुंबामध्ये गुण्या गोविंदाने नांदत आहेत.
या वेळी यांचा सुद्धा सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय बौद्ध महासभा मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली आहे.
अनिल तायडे