नेवासा प्रतिनिधी
रवींद्र लिंबोरे
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने घोगरगाव तालुका नेवासा येथे सोयाबीन उत्पादकता वाढ व प्रक्रिया उद्योग या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री दत्तात्रय डमाळे तालुका कृषी अधिकारी नेवासा कृषी विज्ञान केंद्र दहेगाव चे श्री प्रकाश बहीरट सर श्री प्रमोद गावडे मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक श्री कल्याण शेजुळ तसेच गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी अशोक साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पठारे, सदाशिव बहिरट,
नरहरी शिरसाठ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बबन पऱ्हाड, सोसायटी चेरअमन रामदास शिरसाठ, एकनाथ शिरसाठ, तसेच गावात स्थापन झालेल्या शेतकरी गटांचे सर्व अध्यक्ष सचिव सदस्य सोयाबीन उत्पादक प्रगतशील शेतकरी राऊसाहेब आव्हाड,
रोहिदास बहिरट, सतीश पठारे,गीताराम पवार, राधाकिसन साप्तेश्री, सचिन बहीरट, श्री.नानाभाऊ गीते, बाळासाहेब घोगरे, प्रकाश घोगरे, रवि बहिरट, भाऊसाहेब पटारे, नितीन पराड, जालिंदर घोगरे, बाबासाहेब घोगरे, कृषी सहाय्यक श्री निलेश बिबवे, श्री रामेश्वर राऊत, कृषी सहाय्यक वैभव वैराळ, आदी उपस्थिती व सहकार्य लाभले.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन उत्पादकता वाढ आत्मा या विविध योजना घोगरगाव मध्ये प्रभावीपणे त असताना शेतकरी गटाची स्थापनाहोत असून या त आज भर पावसात सुद्धा जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहिले
हे निश्चित कौतुकाची गोष्ट आहे शेतकरी सोयाबीन बाबत घरगुती बियाणे उत्पादन मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी झाला तसेच लागवडीचे अंतर वाढल्यामुळे बियाणाची बचत झाली तसेच कृषी विभागाच्या शेतकरी शेती शाळा तसेच महाडीबीटी योजनेमध्ये सुद्धा शेतकरी बांधव सक्रिय सहभाग घेत आहेत त्याचप्रमाणे दोन वर्ष चालणाऱ्या सोयाबीन प्रकल्पात शेतकरी बंधूंनी पुढे कंपनी स्थापन करणे कडे जाऊन गावात प्रक्रिया उद्योग उभा करावा या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे मत श्री दत्तात्रय डमाळेतालुका कृषी अधिकारी यांनी व्यक्त केले कृषी विज्ञान केंद्राचे श्री प्रकाश बहिरट सर यांनी शेतकऱ्यांना विविध रब्बी हंगामातील पिका तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.
कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले त प्रतिकूल परिस्थिती त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
JD महाराष्ट्र NEWS
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :
9011302859