घाटनांद्रा प्रतिनिधी
गणेश शिंदे
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा उपक्रमास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव पाटील मोरे हे होते.
यावेळी जिल्हा परिषद गट घाटनांद्रा मध्ये समाविष्ट सर्व गावांतील, महाराष्ट्र शासनातर्फे *राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि. १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२* या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम *जिल्हा परिषद गट मुख्यालय स्तरावर दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते* त्यामध्ये खालील प्रमाणे प्रलंबित अर्ज/संदर्भ प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.
१. फेरफार अदालत
२. रहिवासी प्रमाणपत्र
३. उत्पन्न प्रमाणपत्र / नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
४. शिधापत्रिका
५. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
६. नव्याने नळ जोडणी
७. प्रलंबित घरगुती विद्युत जोडणी
८. दिव्यांगाना प्रमाणपत्र
९. मालमत्ता हस्तांतरण नोंदी
वरील विषयांसंबधी प्रलंबित प्रकरणे असणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आव्हान यावेळी मंडळ अधिकारी एस. एम. जैस्वाल, तलाठी गिरीश झाल्टे तलाठी सी.आर .निर्वाण तलाठी श्रीमतीएस .के . गरुड ग्रामविकास अधिकारी अशोक दौड यांनी यावेळी पुरवठा विभागाच्या 43 पीएम किसान च्या दोन फेरफार एक संजय गांधी योजनेची एक अशा प्रलंबित असलेल्या योजना विषयी माहिती घेऊन त्यांना योग्य असे मार्गदर्शन दिले यावेळी घाटनांद्रा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे सरपंच पती यासीन तडवी माजी पंचायत समिती रामचंद्र पाटील मोरे उपसरपंच कृष्णा मोरे माजी चेअरमन अशोक गुळवे ग्रामपंचायत सदस्य शिवनाथ चौधरी संतोष बिसेन मूजिब मुल्ला कोतवाल पीरखा तडवी पोलीस पाटील नासिर तडवी माजी सभापती डॉक्टर.संजय जामकर योगेश मोरे एकनाथ सुलताने शालेय समिती अध्यक्ष गणेश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.