माजी.आ.भानुदास मुरकुटे येत्या रविवारी आकाशवाणीवर - JDM

JDM


Breaking

Thursday, September 22, 2022

माजी.आ.भानुदास मुरकुटे येत्या रविवारी आकाशवाणीवर


शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
अशोक साखर कारखान्याचे चेअरमन तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आ. भानुदास मुरकुटे यांची येत्या रविवार (ता.२५) रोजी सकाळी ८.३० वाजता नगर आकाशवाणीच्या एफ.एम. केन्द्रावर निवेदक संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत प्रसारीत होणार आहे.
     माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या जीवन प्रवासावर आधारीत सदरची मुलाखत आहे. या मुलाखतीत श्री.मुरकुटे हे आपले शैक्षणिक जीवन, व्यक्तिगत जडणघडण, शिक्षणानंतरच्या घटना, राजकारणातील प्रवेश व राजकीय वाटचाल, सहकारी क्षेञातील वाटचाल, राजकीय व सहकार क्षेञातील कामागिरी, सार्वजनिक जीवनात आलेले अनुभव याबाबतचे पदर उलगडणार आहेत. सदरच्या मुलाखतीतून श्री.मुरकुटे यांच्या जिवनप्रवासाची ओळख श्रोत्यांना होणार आहे. यामुळे रविवार ता.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वा. नगर आकाशवाणीच्या एफ.एम. केन्द्रावर सदरची मुलाखत आवर्जून ऐकावी.