संजय महाजन
रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी तहसील दार कुंदन हिरे यांना निवेदन सादर केले आहे. राहता येथील जुने तहसील कार्यालये येथे सुरू असलेले आधार नोंदणी सेंटरमध्ये सुरू असलेली नागरिक यांची पिळवणूक थांबावी. नागरिकांना अनेक वेळा चकरा माराव्या लागत असून आधार नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी आज वेळ नाही आज 40 कार्ड नोंदणी होईल 8 दिवसांनी या सकाळी 9 .30 वा येऊन थांबा. आम्ही पुकारले नंतर या असे सांगून त्रास दिला जात आहे.
तसेच नागरिकांना खुप वेळ थांबून देखील आधार नोंदणी केली जात नाही सदरील ठिकाणी 1 महिला 1 पुरूष ऑपरेटर असुन नागरिकांना त्यांच्या मनमानी मुळे मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने संबधित विरुद्ध तात्काळ कारवाई अशी मागणी आर पिं आय चे रमेश गायकवाड यांनी केली आहे.