अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील कोळदरा येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या वेळी स्वच्छता अभियान असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले होते.
या साठी युवा एकता संघ कोळदरा यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घेतले तर दि. 1 सप्टेंबर गुरुवार रोजी येथे या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील सौ. मीराबाई करवते, प्रमुख पाहुणे अजय चोथमल ( पत्रकार ), सचीनभाऊ साठे, विशालभाऊ केवट, दीपक भाऊ वानखडे (जल सम्राट), तसेच सहकारी सुरेश भाऊ जावळे, मनोहर जावळे, शीलाबाई करवते, लक्ष्मीबाई करवते, वनमालाबाई देवकर, रेश्माताई हांडे, छगनभाऊ देवकर, यांच्या हस्ते विद्यार्थीना पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले. तर या वेळी सर्व प्रथम वरील मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छा देऊन युवा एकतेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या वेळी विद्यार्थी जानव्ही डाखोरे, आरती करवते, सौरव धंदरे, कोमल जटाळे, निकिता देवकर, ओम जावळे, ओम इंगळे, चेतन गिऱ्हे, रूपाली लठाड, रवी लोखंडे, पल्लवी लठाड, भाग्यश्री लठाड, शितल देवकर यांनी बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक संतोष हांडे, गजानन लठाड, अविनाश देवकर, युवा एकता संघ कोळदरा संस्थापक संतोष हांडे, अध्यक्ष निलेश जटाळे, उपाध्यक्ष अमोल लठाड, सचिव गणेश लठाड, कोषाध्यक्ष सुनील जटाळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.