शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
पालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती (S.C) अनुसूचित जमाती (S.T) इतर मागासवर्ग (O.B.C) भटक्या जमाती(N.T) अ, ब, क, ड या मागासवर्गीय लोकांना आरक्षण दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेश, शिक्षण,नोकरी, शासकीय योजना पासून वंचित होतात. प्रत्येक व्यक्तीला जात प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे सर्वांनी जात प्रमाणपत्र काढावे असे आवाहन करण्यात आले.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज कसा करावा? शिधापत्रिका, अर्जदार वडिलांच्या जातीची नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड दाखला, वडील किंवा रक्ताचा नातेवाईकांच्या जातीचा दाखला, आणि वंशावळ दर्शविणारे प्रतिज्ञापत्र, शेतीचा सातबारा उतारा, स्थानिक वास्तव्याचे पुरावे-तलाठी नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील इत्यादी कागदपत्र जमा करून जात प्रमाणपत्र कसे काढावे? याबद्दल विशेष मार्गदर्शन प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी केले.