महीना अखेरीपर्यंत धान्य दुकानदारांनी दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी: भावले - JDM

JDM


Breaking

Sunday, September 18, 2022

महीना अखेरीपर्यंत धान्य दुकानदारांनी दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी: भावले

शौकतभाई शेख 
श्रीरामपूर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान आय एस ओ मानांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर अनेक बैठका घेवुन सर्व सुचना व मार्गदर्शन करण्यात येवुनही अजुन पर्यत तयारी झालेली नसुन दुकानदारांनी महीना अखेरपर्यत सर्व तयारी करावी अशी सक्त सुचना पुरवठा निरीक्षण अधिकारी दत्तात्रय भावले यांनी दिली.                        
जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने आय एस ओ करावयाची असुन श्रीरामपुर तालुक्यातील दुकानाचा आढावा घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी भावले यांनी बैठक बोलवीली होती त्या वेळी दुकानदारांना मार्गदर्शन करताना भावले म्हणाले की, रंग रंगोटी करणे, रजिष्टर अद्यावत करणे, सर्वत्र एकाच आकाराचे फलक लावावेत, राज्य सरकारने दिलेल्या पुर्तता करून महीना अखेरी पर्यंत सर्व धान्य दुकाने सज्ज करावे, राज्य सरकारने आय एस ओ मानांकना करीता ९१ प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन केले आहे, त्याच बरोबर तहसिलदार प्रशांत पाटील यांनीही तालुकास्तरावर वेळोवेळी  बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे, त्यानुसार अनेक दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वांना एकाच आकाराचे फलक व रजिष्टर देण्यात आले आहेत, उर्वरीत पुर्तता दुकानदारांनी करायची आहे. त्यानुसार आता उर्वरीत दुकानदारांनी यात लक्ष घालून या महिना अखेरी पर्यंत आय एस ओ मानांकनासाठी सज्ज व्हायचे आहे.
ज्या दुकानदारांना आय एस ओ मानांकन प्राप्त होईल त्यांना लवकरच सरकारकडुन सी एस सी केंद्रा सारख्या पुढील व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री.भावले यांनी सांगितले.
या वेळी श्रीरामपूर तालुका गोदामाच्या धान्य पुरवठ्यात मार्च महीन्या पासुन मोठ्या प्रमाणात तुटवडा येत असल्याने तालुक्यांच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. रेशनकार्ड धारक व दुकानदारांत विनाकारण वाद होत आहेत. सध्या सणासुदीचे व पावसाळ्याचे दिवस आहेत. अन्न धान्यांची नितांत गरज आहे.
आम्ही आय एस ओ करीता प्रयत्नशिल आहोत पण तुम्ही आम्हाला वेळेवर धान्य पुरवठा करा अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केली.या वेळी नायब तहसीलदार अभया राजवळ, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी, जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे,तालुकाध्यक्ष बजरांग दरंदले आदिंसह गोपीनाथ शिंदे, दिलीप गायके, माणीक जाधव, सुभाष चोरडीया, प्रकाश गदिया, मुरली वधवाणी, चंद्रकांत गायकवाड, देवराम गाढे, अनिल मानधना, योगेश नागले, अजीज शेख, एकनाथ थोरात, सुधीर गवारे, नरेंद्र खरात, उमेश दरंदले, मच्छींद्र भालके,  श्याम पवार, सचीन मानधने, बाळकृष्ण कांगुणे, विजय मैराळ, राजन वधवाणी, धनु झिरंगे, वासुदेव वधवाणी आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते.